जांबोटी बसच्या वेळेत बदल करा, शिक्षकांचे निवेदन
खानापूर : आज सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा ओलमणी व राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी यांच्या वतीने खानापूर बस आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. खानापूर दोन्ही शाळांमध्ये जांबोटी रोडवरील मोदेकोप, ओतोळी, दारोळी या गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ओलमणी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत सुमारे 35 ते 40 विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, बसची योग्य सोय नसल्याने या विद्यार्थ्यांचे हाल होत असून त्यामुळेच या शिक्षकांनी पुढाकार घेऊन खानापूरहून जांबोटीकडे येणाऱ्या बसची वेळ बदलण्यात यावी किंवा नवीन बसची व्यवस्था करावी, असे निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खानापूर जांबोटी. बस आगारातून सकाळी 9.00 वाजता सुटेल आणि जांबोटी येथून सायंकाळी 4.45 वाजता सुटेल.
khanapur to jamboti bus timing
येत्या काळात या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी तातडीने बससेवा सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ही बससेवा सुरू झाल्यास या विद्यार्थ्यांसह अन्य शासकीय नोकरदार व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही मोठी सोय होणार आहे. निवेदन देताना प्राचार्य सी.एस.कदम सर मुख्याध्यापक पी.आर.गुरव सर सहाय्यक शिक्षक एस.टी. मेलगे सर श्रीमती वर्षा चौगुले आणि श्री. ए.जे.सावंत सर यावेळी उपस्थित होते.
bus from Khanapur to jamboti
khanapur bus stop, belgavi
Khanapur Karnataka bus Stop
new bus stand Khanapur