खानापूर

महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरणावर इन्नरव्हील क्लबचे मार्गदर्शन

खानापूर: इन्नरव्हील क्लबच्या वतीने हलकर्णी मराठी शाळेत महिला दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्राचार्या शरयू कदम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पूजा गुरव, क्लबच्या सेक्रेटरी प्रिया सुळकर, खजिनदार अश्विनी पवार आणि शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने व ईशस्तवनाने झाली. इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि क्लबच्या कार्याबद्दल माहिती दिली. प्रमुख अतिथी पूजा गुरव यांनी महिलांच्या आरोग्य समस्यांवर आणि महिला सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात हलकर्णी येथील संजीवनी महिला मंडळ व धर्मस्थळ संघाच्या वतीने गायन व नृत्य सादर करण्यात आले. यावेळी “मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी” च्या वतीने राज्यस्तरीय “नारी शक्ती सन्मान पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या समारंभाला इन्नरव्हील क्लबचे सर्व सदस्य, शाळेच्या शिक्षिका, विद्यार्थिनी आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दीप्ती बडदाळी यांनी मानले.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते