खानापूर: येथील इन्नरव्हील क्लब च्या वतीने हलकर्णी येथील प्राथामिक मराठी शाळेत पालकांसाठी कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के एन बेलगामी होते.

कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. इन्नर व्हील क्लब च्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम यांनी मार्गदर्शन देताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना पालकांनी शिक्षकांना सहकार्य केले पाहिजेत. शिक्षक हे सर्वतोपारी कार्य करत असतात आपण फक्त विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दुवा झालो पाहिजेत असे विचार व्यक्त केले. प्रमुख वक्त्या शारदा मराठे यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांना कुठलंही दडपण न ठेवता त्यांचा स्वाभिमान न दुखवता त्यांचे मित्र बनून संस्कार करण्याची गरज व्यक्त केली. आय ओ एस अधिकारी दीप्ती म्यॅडम, क्लब च्या माजी अध्यक्षा शिल्पा म्यॅडम यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले..
क्लब च्या वतीने गर्भवती महिलांसाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचे वितरण करण्यात आले. सदर समारंभाला शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते..
