हलगा गाव एकवटले! श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प
खानापूर: तालुक्यातील हलगा ग्रामस्थांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला आहे. शनिवारी (22 मार्च 2025) श्री महालक्ष्मी मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजीत कलाप्पा पाटील यांनी मंदिर जीर्णोद्धाराचा प्रस्ताव मांडला, ज्याला ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला.

बैठकीत निर्णय घेण्यात आला की, लवकरात लवकर मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात यावे. यावेळी हलगा गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या बैठकीला हलगा ग्रामपंचायतीचे नूतन चेअरमन सुनील मारुती पाटील, माजी सदस्य कल्लाप्पा फटाण, नागेशी फटाण, तुकाराम फटाण (पी.के.पी.एस. सदस्य), निवृत्त शिक्षक एम.जी. पाटील, माजी सदस्य अमृत फटाण, हणमंत पाटील, वसंत सुतार, प्रमोद सुतार, पुंडलिक पाटील, गंगाराम फटाण, लक्ष्मण बिस्टेकर, ओमाना केसरेकर, गोपाळ ईश्राण, धाक्लोजी बिस्टेकर, विजय ईश्राण, सुरेश रुपण, बाबू गुरव, ज्ञानेश्वर सनदी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवारी (24 मार्च 2025) श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीची स्थापना करून कामाला अधिकृत सुरुवात करण्यात येईल. गावातील जे लोक कामानिमित्त बाहेरगावी आहेत, त्यांनी देखील या बैठकीला उपस्थित राहावे व आपले विचार मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून या नव्या संकल्पनेला चालना द्यावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.