खानापूर
गोदगिरी-खानापूर बस मेरडा जवळ अडकली, डोक्यात मार बसल्याने वृद्ध महिला जखमी
खानापूर: खानापूर तालुक्यात रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे अशाच प्रकारे आज दि. 5 ऑगस्ट गोदगिरी-खानापूर सकाळची बस मेरडा गावाजवळ एका खड्ड्यात अडकल्याने रस्त्यावरील परिस्थिती अडचणीची बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीला साईड देत असताना रस्त्याच्या बाजूने जात असताना एका चरित बस अडकली आहे. सोमवार सकाळची गोदगिरी बस नागरगाळी मार्गे खानापूर ला येताना मेरडा गावापासून 500 मीटर अंतरावर पडलेल्या एका खड्ड्यात बस अडकली आहे.
सदर बसमध्ये विद्यार्थी व नागरिक होते त्यामधील एक वयोवृद्ध महिलेच्या डोक्याला मार बसला असून ती महिला जखमी झाली आहे. सध्या बस अडकलेली असून बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
एकंदरीत या रस्त्यावरील परिस्थिती अडचणीची बनली आहे.