बातम्या

जांबोटी: आमगाव आणि कौलापूरवाडा पोल्ट्री प्रकरणी डीसिंची भेट

जांबोटी: आज रविवारी दुपारी 4 च्या सुमारास खानापूर कॉंग्रेसच्या पदाधिकारीनी बेळगावचे डीसी, सीईओ व एसपी यांच्या समोर कौलापूरवाडा पोल्ट्री आणि आमगाव संदर्भात जांबोटी येथे चर्चा केली. 

आज बेळगावचे डिसी  मोहोम्मद रोशन हे जांबोटी येथे येणार असे कळल्यानंतर कौलापूरवाडा येथील जनता व खानापूर कॉंग्रेस चे पदाधिकारी जांबोटी येथे जाऊन डीसी साहेबांची भेट घेतली.

लोकांच्या आरोग्यांशी खेळून इंडस्ट्री जगवू नका. इंडस्ट्री तुम्ही लवकरात लवकर शिफ्ट करा अशी मागणी केली.

यावेळी डीसी साहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊन तुम्हास कळवितो असे सांगितले. यानंतर खानापूर कॉंग्रेसच्या नेत्यांनी आमगाव चा विषय डीसी समोर उपस्थित केला. डीसी साहेबांनी थोडा पाऊस कमी झाला की आपण  सर्वजण आमगावला जाऊयात असे सांगितले.

लोकशाही मार्गाने खानापूर तालुका कॉंग्रेस कौलापुरवाड्याच्या जनतेसोबत आहोत व पुढेही शेवटपर्यंत राहू, असे कौलापूरवाडा जनतेला सांगितले.

आज डीसी ना निवेदन देण्यासाठी महादेव कोळी, ॲड. ईश्वर घाडी, दिपक कवठनकर, महांतेश राऊत, विनायक मुतगेकर, सुरेश भाऊ, भैरू पाटील, सखुबाई पाटील, प्रदीप कवठनकर, ज्ञानेश्वर कसारलेकर, कौलापूरवाड्याचे ग्रामस्थ व महिला तसेच जांबोटी भागातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तसेच तालुक्यातील अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

Related Articles

अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते