खानापूर

खानापूर को-ऑप बँकेच्या मतमोजणीला हिरवा कंदील,मतमोजणी रविवारी?

खानापूर: खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रखडलेल्या मतमोजणीला अखेर न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे. धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालयात आज (ता. ३०) झालेल्या सुनावणीत मतमोजणीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.

सहकार खात्याच्या निबंधकांनी मतमोजणीची तारीख लवकरच जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक प्रक्रियेतील अडथळे:

  • बँकेची निवडणूक १२ जानेवारी रोजी मोठ्या चुरशीने पार पडली होती.
  • मात्र, दोन्ही पॅनेलने मतदार यादीतील वाढीच्या मुद्यावर उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे मतमोजणी स्थगित करण्यात आली होती.
  • या स्थगितीमुळे मतपेट्या तहसीलदारांच्या अखत्यारीत ठेवल्या होत्या.
  • तब्बल १८ दिवसांपासून उमेदवार आणि मतदार तणावात होते.

उमेदवार आणि मतदारांना दिलासा:

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना दिलासा मिळाला असून मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मतमोजणी रविवारी?

जिल्हा सहकार निबंधकांनी सुट्टीच्या दिवशी मतमोजणी घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या रविवारी (ता. २) मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते