खानापूर

आमदार हलगेकरांवरची टीका दिशाभूल करणारी – भरमानी पाटील, काँग्रेसचे प्रत्युत्तर |  ಶಾಸಕ ಹಲಗೇಕರ ವಿರುದ್ಧದ ಟೀಕೆ ದಾರಿತಪ್ಪಿಸುವಂತದ್ದು – ಭರಮಾನಿ ಪಾಟೀಲ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತಿರುಗೇಟು

खानापूर : तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्यावर करण्यात आलेली टीका ही वस्तुस्थितीपासून दूर असून, तालुक्यातील जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी केला आहे. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आमदार हलगेकर यांच्या विकासकामांचा हिशोब मांडला आहे.

तालुक्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला

भरमानी पाटील यांनी व्हिडीओतून बोलताना सांगितले की, आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये लक्ष्मी यात्रा व ग्राम यात्रांना विशेष महत्त्व असून, जिल्हा व राज्यस्तरावर पाठपुरावा करून या यात्रांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.

रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर

खानापूर शहरातील महत्त्वाची वस्ती समजल्या जाणाऱ्या मयेकर नगरचा रस्ता पूर्णतः सुधारण्यात आला आहे. ‘राजा स्टाईल’ रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करून घेण्यात आला असून, संबंधित काम सध्या प्रगतीपथावर आहे. यापूर्वी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती, मात्र आता नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होत आहेत.

यासोबतच रामगुरवाडी रस्ता, मारुती नगरचा रस्ता, खानापूर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता यांची कामे पूर्ण किंवा अंतिम टप्प्यात असून, तालुक्यातील अमृतुल्य पाणी योजनेचे कामही वेगाने सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

काँग्रेस नेत्यांवर टीकेचा सूर

आम्हीच खरे आणि इतर खोटे असा प्रचार करून जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा भरमानी पाटील यांनी दिला. राज्यात सध्या काँग्रेसचे सरकार असून, त्यांनीही विकासकामे मंजूर करून आणावीत आणि प्रत्यक्ष काम करून दाखवावे, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

कमी निधीत अधिक विकासाचा आदर्श

घागरी धरणात कमी पाणी असतानाही नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा कसा करायचा, हे आमदार हलगेकर यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. कमी निधीत अधिक विकास साधणे, हाच त्यांच्या कार्यपद्धतीचा गाभा असल्याचे भरमानी पाटील यांनी स्पष्ट केले..

काँग्रेसकडून भरमानी पाटील यांना प्रत्युत्तर


खानापूर विकास आघाडी म्हणजे प्रत्यक्षात हलगेकर विकास आघाडी असल्याचा आरोप करत काँग्रेसने म्हटले आहे की, तालुक्यातील रस्त्यांची वस्तुस्थिती पाहण्यासाठी एकदा संपूर्ण तालुका फिरून पाहावा. किती रस्त्यांची कामे झाली आहेत आणि किती रस्ते आजही खड्डेमय अवस्थेत आहेत, हे जनतेला चांगलेच माहीत आहे. अलीकडेच तयार करण्यात आलेल्या काही रस्त्यांची चाळण अवघ्या चार महिन्यांत झाली असून, जांबोटी–कणकुंबी–चोर्ला परिसरातील नागरिक हे स्वतः अनुभवत आहेत. तालुकाभर खरोखर विकास झाला आहे की भकास, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. सोशल मीडियावर कितीही पोस्ट केल्या तरी सत्य लपणार नाही. त्यामुळे लबाडी थांबवून जनतेच्या प्रत्यक्ष कामांकडे लक्ष द्यावे आणि आपली अपयशे इतरांवर ढकलू नयेत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांचे उत्तर


या आरोपांना सोशल मीडियावर उत्तर देताना ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी सांगितले की, प्रश्न काम कोण करत आहे किंवा करत नाही याचा नसून, प्रत्येक वेळी माजी आमदारांचेच नाव घेऊन आरोप केले जातात. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याविषयी आदर असल्यामुळेच ते हे स्पष्टपणे मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदारांनी स्वतः सांगितले होते की, त्यांच्या बाबतीत केलेले आरोप जर सिद्ध झाले, तर ते राजकारण कायमचे सोडतील—म्हणून आरोप हे केवळ बोलण्यापुरते न ठेवता पुराव्यांसह सिद्ध करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच तालुक्यातील एक नागरिक म्हणून त्यांनी विनंती केली की, आमदारांनी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा करावा, कारण प्रशासनाच्या मागे लागल्याशिवाय विकासकामे होत नाहीत. यापूर्वी समितीचे आमदार असताना प्रयत्नपूर्वक विकासकामे झाली, तसेच मागील कार्यकाळात भाजप सरकार असताना विधानसभेत आवाज उठवून निधी आणण्यात आला होता; त्याच धर्तीवर आताही कामे व्हावीत. गरज भासल्यास सर्वांनी एकत्र येऊन काम करूया आणि खानापूर तालुक्याला प्रगतीपथावर नेऊया, असेही प्रसाद पाटील यांनी स्पष्ट केले. DCC bank आणि इतर गोष्टींसाठी सगळे एकत्र बसू शकतात चर्चा होतात तर मग तालुक्याचा विकास करण्यासाठी का नाही.. असेही ते म्हणाले


ವೀಡಿಯೋ ಮೂಲಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳ ವಿವರ; ಶಾಸಕರ ವಿರುದ್ಧದ ಟೀಕೆ ದಾರಿತಪ್ಪಿಸುವುದು – ಭರಮಣಿ ಪಾಟೀಲ

ಖಾನಾಪುರ :
ತಾಲೂಕು ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರಿಂದ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಳಗೇಕರ್ ವಿರುದ್ಧ ನಡೆಸಲಾದ ಟೀಕೆ ವಾಸ್ತವದ ಆಧಾರವಿಲ್ಲದೆ ಜನತೆಯನ್ನು ದಾರಿತಪ್ಪಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದ್ದು, ಖಾನಾಪುರ ತಾಲ್ಲೂಕಿನಲ್ಲಿ ಈವರೆಗೆ ನಡೆದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ವೀಡಿಯೋ ಮೂಲಕ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿರುವುದಾಗಿ ತಾಲ್ಲೂಕು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮೈತ್ರಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಭರಮಣಿ ಪಾಟೀಲ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.


ತಾಲ್ಲೂಕಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಸಂಪೂರ್ಣ ಲೆಕ್ಕಪತ್ರ

ಭರಮಣಿ ಪಾಟೀಲ ಅವರು ವೀಡಿಯೋ ಸಂದೇಶದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ, ಶಾಸಕರಾದ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಳಗೇಕರ್ ಅವರ ಕಾರ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಬಾಕಿಯಿದ್ದ ಅನೇಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆಗಳು ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ಬಂದಿವೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ತಾಲ್ಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜಾತ್ರೆ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಜಾತ್ರೆಗಳು ಸಾರ್ವಜನಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದ್ದು, ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆಸಿ ಈ ಜಾತ್ರೆಗಳಿಗೆ ಅಗತ್ಯ ಅನುದಾನವನ್ನು ತರಲಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮಕ್ಕೆ ಉತ್ತೇಜನ ದೊರೆತಿದ್ದು, ಸ್ಥಳೀಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೂ ವೇಗ ಸಿಕ್ಕಿದೆ ಎಂದರು.


ರಸ್ತೆ, ನೀರು ಹಾಗೂ ಮೂಲಸೌಕರ್ಯಗಳಿಗೆ ಆದ್ಯತೆ

ಖಾನಾಪುರ ನಗರದ ಪ್ರಮುಖ ವಸತಿ ಪ್ರದೇಶವಾಗಿರುವ ಮಯೇಕರ್ ನಗರ ರಸ್ತೆಯನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗಿದ್ದು, ‘ರಾಜಾ ಸ್ಟೈಲ್’ ರಸ್ತೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅನುದಾನ ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಈ ಕಾಮಗಾರಿ ಪ್ರಸ್ತುತ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಹಿಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ರಸ್ತೆ ಅತ್ಯಂತ ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿತ್ತು ಎಂದು ಪಾಟೀಲ ಹೇಳಿದರು.

ಇದೇ ವೇಳೆ ರಾಮಗುರವಾಡಿ ರಸ್ತೆ, ನಗರದ ಮಾರುತಿ ನಗರ ರಸ್ತೆ, ಖಾನಾಪುರ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಪ್ರಮುಖ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ದು ಅಥವಾ ಅಂತಿಮ ಹಂತದಲ್ಲಿವೆ. ಜೊತೆಗೆ ತಾಲ್ಲೂಕಿನಲ್ಲಿ ಅಮೃತುಲ್ಯ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಯೋಜನೆಯ ಕಾಮಗಾರಿಯೂ ವೇಗವಾಗಿ ಸಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು.


ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರಿಗೆ ತೀಕ್ಷ್ಣ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ

ನಾವು ಮಾತ್ರ ಸತ್ಯ, ಇತರರು ಸುಳ್ಳು ಎಂಬಂತೆ ಜನರನ್ನು ಗೊಂದಲಕ್ಕೆ ತಳ್ಳುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಾರದು ಎಂದು ಭರಮಣಿ ಪಾಟೀಲ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಪ್ರಸ್ತುತ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವುದರಿಂದ, ಅವರು ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಂದು ನೆಲಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತೋರಿಸಲಿ ಎಂದು ಸವಾಲು ಹಾಕಿದರು.


ಕಡಿಮೆ ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಮಾದರಿ

ಘಾಗರಿ ಜಲಾಶಯದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆ ಇದ್ದರೂ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಸಮರ್ಪಕ ನೀರು ಸರಬರಾಜು ಮಾಡುವುದನ್ನು ಶಾಸಕರಾದ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಳಗೇಕರ್ ಕಾರ್ಯರೂಪದಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಕಡಿಮೆ ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಾಧಿಸುವುದೇ ಅವರ ಆಡಳಿತ ಶೈಲಿಯ ಮುಖ್ಯ ಲಕ್ಷಣ ಎಂದು ಭರಮಣಿ ಪಾಟೀಲ ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟರು.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या