खानापूर

मणतुर्गा पुलावर दुचाकी गेली वाहून! युवकाला वाचवण्यात यश

खानापूर: शहापूर बेळगाव येथील रहिवासी असलेले विनायक जाधव हे स्प्लेंडर दुचाकीवरून हेमाडगामार्गे गोव्याहून खानापूरकडे येत असताना मंतुर्गा जवळील हालत्री नदीवरील जलयुक्त पुलावरून दुचाकीवरून जात असताना दुचाकी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली व विनायक हे नदीकाठावरील झुडपात अडकले.

ही वार्ता समजताच अग्निशमन दल व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर आणि भाजप युवा नेता पंडित ओगले यांनी दोरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीला बाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र स्प्लेंडर दुचाकी वाहून गेली. यावेळी सर्वांनी एकचं गर्दी केली होती.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते