खानापूर

बेळगाव-खानापूर महामार्गावर अपघात; एक जागीच ठार

खानापूर : भरधाव दुचाकीची धडक बसल्याने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. साताप्पा मल्लाप्पा खोत (वय 45, रा. लिंगायत गल्ली, प्रभूनगर, ता. खानापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अपघाताचा घटनाक्रम:
हिमांशू राजेंद्र यादव (वय 29, रा. स्टेशन रोड, खानापूर) हा तरुण दुचाकीवरून बेळगावहून खानापूरच्या दिशेने येत असताना प्रभूनगर येथे साताप्पा खोत रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात साताप्पा खोत उडून रस्त्यावर पडले, तसेच दुचाकीस्वारही खाली कोसळला.

या धडकेत साताप्पा खोत गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी हुबळी येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकीस्वार हिमांशू यादव हाही या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत खानापूर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?