खानापूर
खानापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत अमृत शेलार यांच्या सहकार पॅनेलचा विजय

खानापूर: येथील खानापूर को-ऑप बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीत आज शनिवारी (ता. 8) सहकार पॅनेलने विजय मिळवत बँकेवरील वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत विरोधी बँक विकास पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. निवडणुकी दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण विद्यमान संचालकांनी या आरोपांना खोटे पाडत सभासदांचा विश्वास संपादन करून चांगल्या मतांनी विजय मिळवला आहे.
विरोधी पॅनेलमधून निवडणूक लढवणारे विद्यमान संचालक मारूती खानापुरी आणि शिवाजी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला तर विरोधी पॅनेलमधील एकमेव उमेदवार बाळासाहेब शेलार यांचा विजय झाला आहे. विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांच्या गटाने बँकेवरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
मतदानानंतर सहकार पॅनेलच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.

