खानापूर

हालात्री नदी पुलानजीक पुन्हा बस अडकली, वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुर्दशेत भर

खानापूर: खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील रेल्वे गेट, हालात्री नदी पुलानजीक तसेच हारुरी व शेडेगाळी क्रॉस दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. रेल्वे फाटकाजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्ग म्हणून केलेल्या रस्त्यावरही चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर दररोज गाड्या बस अडकून वाहनधारकांची धांदल उडत आहे.

गोव्याला जाण्यासाठी वाहतूकदार तसेच कदंबा महामंडळाच्या बसेस या पर्यायी हेम्माडगा अनमोड मार्गाचा वापर करतात त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. फूट ते दीड फूट खोल असलेल्या या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात खोलीचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी व चारचाकीचे अपघातही घडत आहेत.

मागील पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने रस्ता पूर्णपणे उखडून पुन्हा मोठे मोठे खड्डे पडून तळ्यांचे स्वरूप आले आहे. याचबरोबर काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या दोन्ही समस्यांनी या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

या मार्गावरुन पायी व सायकलवरुन जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ये-जा असते. वाहनांच्या वर्दळीत खड्ड्यातील साचलेल्या पाण्याच्या अंगावर येणाऱ्या शिडकाव्यापासून बचाव करताना विद्यार्थ्यांची धांदल उडत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. 

पर्यायी मार्गाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही

रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र जमीन वापरलेल्या शेतकऱ्याला  (शेडेगाळी येथील शेतकरी पंडित यशवंत चव्हाण सर्वे नंबर 26) यांनी नाराजी व्यक्त केली असून कॉन्ट्रॅक्टरने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्ता बंद केला जाईल इशारा दिला आहे.

bus stuck on anmod road near manturga

Khanapur-hemmadaga road condition

road condition khanapur-anmod road

#anmod

#hemmadaga

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या