खानापूर लायन्स क्लबकडून शासकीय शाळेला ट्यूबलाईट्स वाटप
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रकाशाची देणगी
लायन्स क्लब नेहमी समाजसेवेत अग्रेसर
खानापूर : खानापूर येथील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या प्रकाशाच्या कमतरतेची जाणीव होताच खानापूर लायन्स क्लब पुढे सरसावला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी शाळेला नवीन ट्यूबलाईट्स पुरविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
लायन्स क्लब सदैव समाजसेवेत आघाडीवर असून, विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांच्या हितासाठी कार्यरत आहे. याच परंपरेत शासकीय शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी ‘प्रकाशाचा किरण’ ठरून ही मदत केली आहे.
ट्यूबलाईट्स शाळेच्या शिक्षकांना सुपूर्द करून शाळेच्या मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी हातभार लावला आहे. “मुलांचे भविष्य उजळण्यासाठी आधी त्यांच्या शाळेत प्रकाश असणे गरजेचे आहे. योग्य सुविधा मिळाल्यास त्यांच्या अभ्यासाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल,” असा विश्वास या उपक्रमामागे व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष विकस कल्याणी, रवीसागर उप्पीन, माजी अध्यक्ष अजीत पाटील, बसवराज हम्मन्नवर, एम. जी. बेण्णकट्टी यांच्यासह लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.