नोकरी

कर्नाटक: नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी हि बातमी वाचा

कर्नाटकातील जनतेसाठी नवीन APL किंवा BPL रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत संपूर्ण माहिती आम्ही दिली आहे.

Karnataka New Ration Card: कर्नाटकात नवीन रेशनकार्डसाठी अनेकजन आतुरतेने वात पाहत आहेत. अर्ज करण्याची हि प्रक्रिया मागील दीड वर्षांपासून रखडली होती. पण लवकरच नवीन रेशन कार्डसाठी अर्ज घेतले जाणार आहेत असे अन्न व नागरी पुरवठा विभागाने सांगितले आहे. नवीन रेशनकार्डसाठी जूनमध्ये पुन्हा अर्ज सुरू होणार आहेत. त्यापूर्वी अर्जदारांनी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत. पात्र उमेदवारांनी रेशन कार्डसाठी कोणत्या वेबसाईट जावे हे सर्व सांगितले आहे.

सध्या फक्त निधन झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करणे आणि महिलांना कुटुंबप्रमुख करण्याचे काम केले जात आहे. नवीन सदस्याचे नाव वाढवणे किंवा कोणतीही दुरुस्ती करणे बंद आहे. त्यामुळे, नवीन रेशनकार्डसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ज्यांची नावे कर्नाटक राज्याच्या रेशनकार्ड यादीत नाहीत, ते सर्वजन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतात. कर्नाटकमध्ये नवीन एपीएल आणि बीपीएल रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दल हा लेख आहे.

कर्नाटका रेशन कार्ड साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • वोटिंग कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइजचा फोटो
  • मोबाईल नंबर

तुमच्याजवळ ही कागदपत्रे असतील तरच तुम्ही नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. आपण kar.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. त्यानंतर होमपेजवरील ई-सर्व्हिसेस पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही थेट https://ahara.kar.nic.in/Home/EServices वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करू शकता. त्यानंतर ई-रेशन कार्ड निवडू शकता. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची लिंक मिळेल. तेथे क्लिक करा आणि अर्ज करण्यासाठी भाषा निवडा.

आवश्यक सर्व माहिती भरा. आपण BPL Karnataka Ration Card किंवा APL Karnataka Ration Card साठी अर्ज करीत आहात हे निवडणे आवश्यक आहे. हे पूर्ण भरल्यानंतर शेवटी अर्जासोबत तिथे मागवलेल्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करून नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.

रेशन कार्ड बद्दल महत्वाच्या ठळक गोष्टी

  • जून महिन्यापासून पुन्हा नव्या रेशनकार्डसाठी अर्ज सुरू होणार
  • कर्नाटक रराज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईट वरून अर्ज करावा लागेल.
  • ज्यांची नावे रेशनकार्ड मध्ये नाहीत ते कागदपत्रांसह अर्ज करू शकतात.

बीपीएल रेशन कार्डसाठी अर्जांचा स्वीकार 

आवश्यक असलेल्या वैद्यकीय सेवेसाठी बीपीएल रेशन कार्डसाठी बेळगाव जिल्ह्यातून 20 आपत्कालीन अर्ज आले होते. यासाठीच अन्न व नागरी विभागाने फक्त वैद्यकीय सेवेसाठी 21 तारखेला सकाळी 10 ते 2 पर्यंत सर्वर सुरु केले होते.

अर्ज करण्याची तारीख

रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची तारीख लवकरच घोषित होणार आहे. सर्वात आआधी जाणून घेण्यासाठी खानापूरवार्ता वाचत रहा.

कर्नाटक राज्यातील आणि सीमाभागातील महत्वाच्या सरकारी योजना, सरकारी नोकरी आणि बातम्यांचे सर्पूर्ण अपडेट मिळविण्यासाठी खानापूरवार्ता ग्रुप, सोशल मिडीया फॉलो करा.

karnataka ration card status, karnataka ration card date, karnataka ration card correction date, ration card apply online

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते