सिद्धरामय्या सरकारची पहिली विकेट; मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा
बेंगळुरू : वाल्मिकी विकास महामंडळातील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर सिद्धू सरकारचे मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा दिला आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काँग्रेस सरकारची पहिली विकेट पडली. बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत मंत्री बी. नागेंद्र। मी स्वत:च्या मर्जीने राजीनामा देत आहे.
मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. निर्दोष मुक्त होऊन परत येण्याचा मला विश्वास आहे. सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकचे मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा Karnataka minister B Nagendra tenders resignation
कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ लिमिटेडमधील बेकायदेशीर मनी ट्रान्सफर चा प्रकार २६ मे रोजी लेखा अधीक्षक चंद्रशेखर पी यांच्या आत्महत्येनंतर उघडकीस आला होता.
त्यांच्या डेथ नोटमध्ये १८७ कोटी रुपयांचे अनधिकृत हस्तांतरण करण्यात आले असून ८८ कोटी ६२ लाख रुपये नामांकित आयटी कंपन्या आणि हैदराबादयेथील सहकारी बँकेच्या खात्यांसह विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत.
नागेंद्र यांच्या खात्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येणाऱ्या महामंडळाचे १८७ कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यातून अनधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आले आणि त्यातून ८८.६२ कोटी रुपये ‘नावाजलेल्या’ आयटी कंपन्या आणि हैदराबादस्थित सहकारी बँकेच्या विविध खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आल्याचे या चिठ्ठीत उघड झाले आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी बैठक घेतली. दोषी आढळल्यास पुन्हा सेवेत रुजू करण्याचे आश्वासन देत त्यांनी मंत्री नागेंद्र यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर आज मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा दिला आहे.