खानापुर: विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या वतीने या वर्षी अबनाळी येथे तिसरी कारगिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
यापूर्वी ही मॅरेथॉन २०२३ मध्ये बेळगाव येथील लेले ग्राउंडवर आणि २०२४ मध्ये विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर यशस्वीरित्या पार पडली आहे. या वर्षीच्या स्पर्धेच्या रूपरेषेबाबत विचारमंथन करण्यासाठी रविवार, ११ मे रोजी सकाळी १० वाजता खानापूर येथील रवळनाथ मंदिरात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग, महिला मंडळ, पालक, क्रीडाप्रेमी, विविध संघ व संस्था, तसेच विश्वभारती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी केले आहे.