कापोली येथे आर.जी.देसाई फाउंडेशनच्या वतीने टी-शर्ट व शैक्षणिक साहित्य वाटप
खानापूर: सरकारी मराठी शाळा कापोली येथे आर.जी.देसाई फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना टी-शर्ट व बक्षीस रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाला लागणारे पूरक साहित्य आणि भावी आयुष्यामध्ये शिक्षणाचा उपयोग आदी विषयावर मान्यवरांनी आपले मनोगत मांडले.
हा द्विगुणित कार्यक्रम प्राथमिक मराठी शाळा कापोली येथे पार पडला .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे संस्थापक रमेश देसाई सर ,कृष्णराव देसाई,शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष संतोष रामचंद्र देसाई आणि उपाध्यक्ष ज्योती जयवंत सावंत, कमिटी सदस्य अविनाश बाळेकुंद्री, नागेश सूर्याची देसाई, राजेश मोहन नाबार, संतोष मुरारी देसाई, पांडुरंग देसाई, प्रशांत देसाई, अश्विनी सावंत, रेणुका गुरव,माधुरी मादार, अमृत देसाई, जगन्नाथ देसाई आदी गावातील शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक एस. के. शिंदे सर,शिक्षकवृंद लाटगांवकर सर ,रेणुका टीचर, चोपडे टीचर आदी उपस्थित होते. या कार्यक्रम सोहळ्याचे सूत्रसंचालन बी .एस तशिलदार टीचर यांनी केले.