कणकुंबी माऊली शिमगोत्सव का आहे खास वाचा आणि नक्की भेट द्या
खानापूर: रंगांची उधळण करणारा शिमगोत्सव म्हणजे निसर्ग आणि लोकसंस्कृतीशी असलेला परंपरेचा गोड मिलाप. शिमग्याचा उत्सव खासकरून तालुक्याच्या घाटमाथ्यांवर वसलेल्या पश्चिम भागात वेगळ्या रंगात रंगतो. करवल्या, रंगमाला, रोमटामेळ आणि शिंपणे यासारख्या पारंपरिक लोककलांनी होळीच्या सणात अधिक उत्साह निर्माण होतो. या खास आणि आनंददायी सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी गोवा आणि महाराष्ट्रातील रसिक देखील गावागावात एकत्र येतात. या उत्साही पर्वाची सुरुवात उद्या गुरुवार, १३ तारखेला होणार आहे. येथे 13 मार्च ते 20 मार्च दरम्यान श्री माऊलीदेवी शिमगोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा
दिवस 1 – मार्च 13 (गुरुवार)
दुपारी 12 वाजता होळीचे गाऱ्हाणे आणि संध्याकाळी जंगलात होळी आणण्यासाठी प्रस्थान. रात्री 8 वाजता श्री माऊलीदेवीच्या पालखीचे चव्हाटा मंदिराकडे आगमन आणि स्थापना.
दिवस 2 – मार्च 14 (शुक्रवार)
सकाळी होळी गावाच्या वेशीतून चव्हाटा मंदिराकडे वाजत-गाजत आगमन. 12 वाजता होळी उभारणे, वेषीतील होळी उभारणे आणि बाजारगल्लीतील होळी पेटवणे. संध्याकाळी 6 ते 8 भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि रात्री 10 वाजता पारंपरिक “चोर” कार्यक्रम.

दिवस 3 – मार्च 15 (शनिवार)
सकाळी देवीच्या निशाणी, होड, अब्दागिरी यांचे पूजन. 1 वाजता सत्यनारायण महापूजा आणि आरती. रात्री 9 वाजता “रणमाले” आणि 1 वाजता सुर्ला-सत्तरी, गोवा (महिला) प्रस्तुत कोकणी कॉमेडी नाटक – “आवय तिरंगी मम्मी फिरंगी”.
दिवस 4 – मार्च 16, 2025 (रविवार)
1 वाजता धुलीवंदन सोहळा, लाड लक्ष्मीची तिर्थघाटावर स्नान यात्रा आणि मंदिरात दर्शन. संध्याकाळी 7 वाजता “घोडेमोडणी” पारंपरिक कार्यक्रम. रात्री 9 वाजता श्री माऊलीदेवी नाट्यमंडळ कणकुंबी सादर करीत असलेला नाटक – “संत गोरा कुंभार”.
दिवस 5 – मार्च (सोमवार)
घरोघरी रणमाले आणि टिपरी खेळ. 10 वाजता “रणमाले” पारंपरिक कार्यक्रम आणि 11 वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम.
दिवस 6 – मार्च (मंगळवार)
रात्री 2 वाजता माले हा पारंपरिक कार्यक्रम. 11 वाजता रंगसंगती गोवा निर्मित आणि विशाल साळगावकर प्रस्तुत दोन अंकी कोकणी नाटक – “बायको माझी सायको”.
दिवस 7 – मार्च (बुधवार)
सकाळी 8 वाजता वाजत-गाजत श्री माऊलीदेवीच्या पालखीची रामेश्वर मंदिर, माऊलीदेवी मंदिर, रवळनाथ मंदिर, आणि बिर मंदिराला भेट. यानंतर रंगपंचमी उत्सवाची सुरुवात. 4 वाजता “श्री माऊलीदेवीची ओटी भरण्याचा सौभाग्यवतींचा कार्यक्रम” आणि रात्री 10 वाजता पारंपरिक “रणमाले” कार्यक्रम.
दिवस 8 – मार्च 20 (गुरुवार)
श्री माऊलीदेवीच्या पालखीचे चव्हाटा मंदिरातून श्री माऊलीदेवी मंदिराकडे प्रस्थान. तुळाभराचा कार्यक्रम पार पडल्यानंतर या भव्य उत्सवाची सांगता होईल.
भाविकांसाठी आवाहन
सर्व भाविकांनी सहकुटुंब या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.