खानापूर

चार दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ कालव्यात, पोलिस तपास सुरू

कागवाड: नवजात शिशुचा मृतदेह कालव्यात फेकल्याची अमानवीय घटना तालुक्यातील मोळे गावातील कवलगुड्ड रस्त्याजवळ घडली आहे. शुक्रवारी कवलगुड्ड-मोळे रस्त्यामधील बोरगाव बागेजवळ असलेल्या ऐनापूर सिंचन कालव्यात शेतात काम करणाऱ्या कामगाराला नवजात मुलीचा मृतदेह आढळला.


कामगाराने तात्काळ गावातील प्रमुख आणि कागवाड पोलिसांना माहिती दिली. राज्याच्या सीमेवरील या हृदयद्रावक घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तीन-चार दिवसांपूर्वी मुलीला जन्म देऊन कालव्याच्या पाण्यात फेकून दिल्याचा संशय आहे.

घटनास्थळी बालविकास अधिकारी संजीवकुमार सदलगे आणि कागवाड पोलिस ठाण्याचे पीएसआय जी.जी. बिरादार यांनी भेट देऊन तपास केला. तसेच अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी आणि सीपीआय संतोष हल्लूर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते