नोकरी

रेल्वेमध्ये विविध पदांच्या 7951 जागांसाठी भरती : ऑनलाईन अर्जाची लिंक जाहीर., जाणून घ्या अर्ज कसा करावा?

RRB JE Recruitment 2024 : रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आणि इतर पदांच्या भरतीसाठी रेल्वेने ऑनलाइन अर्जाची लिंक जारी केली गेली आहे. पदावर रुजू झाल्यानंतर 35,400 ते 44,900 रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज प्रक्रिया करू शकतात.

यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 7951

भारतीय रेल्वेने जेई, सहाय्यक, पर्यवेक्षक, अधीक्षक यासह विविध 7951 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. सुरुवातीला या पदांसाठी मूळ वेतन ४४ हजार ९०० रुपये आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक आज जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील जाणून घेऊन लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

एकूण रिक्त पदांची संख्या 7951


शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा, बीई, बीएस्सी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : 35,400/- ते 44,900/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024

रेल्वेच्या जेई, पर्यवेक्षक, सहाय्यक, इतर पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

रेल्वे पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील आणि माहिती

अर्जदारांना आपले नाव, आधार कार्डतपशील, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख नोंद, लिंग माहिती, ईमेल पत्ता, मोबाइल क्रमांक, शैक्षणिक पात्रता, आरक्षण मागणारे दाखले आणि इतर काही वैयक्तिक तपशील सादर करावा लागेल. प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक

https://indianrailways.gov.in/

येथे क्लिक करा

jobs in Indian railway

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते