जांबोटी विभागीय पातळीवरील माध्यमीक शाळांच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
खानापूर: आज गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी राजश्री शाहू हायस्कूल ओलमणी या ठिकाणी जांबोटी विभागीय पातळीवरील माध्यमीक शाळांच्या क्रीडा स्पर्धा 2024-25 चा उद्घाटन समारंभ व 2022 – 23 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुकाराम हनुमंतराव साबळे चेअरमन राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी हे होते. स्पर्धेचे उद्घाटन श्री दत्ता कणबर्गी गुंतवणूक सल्लागार यांनी केले.
यावेळी उपस्थीत मान्यवरांनी विचार मांडले “खेळाचे महत्व त्याचबरोबर शरीर हीच खरी संपत्ती” खेळातील प्रामाणिकपणाचे महत्त्व, देशातील ऑलम्पिक स्पर्धांचे महत्त्व सांगण्यात आले. यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धेत विजयीl स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले. तसेच भारत देशात 150 करोड लोकसंख्या असून सुद्धा एकही सुवर्ण पद मिळाले नाही ही खेदही व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन श्री विश्वनाथ डीचोलकर चेअरमन हनुमान को ऑफ -सोसायटी ओलमणी यांनी केले. कार्यक्रमाला लक्ष्मण झांजरे, विठ्ठल नाकाडी,सयाजी देसाई, जोतिबा नावलकर, कृष्णाकांत बिर्जे , पुंडलीक रा . नाकाडी, विलास कृष्णा बेळगावकर, शाहू गोविंद राऊत, सुनील शंकर देसाई, किरण गावडे, मारुती पाटील, मुख्याध्यापक सी .एस कदम, मुख्याध्यापक एसटी पाटील, श्री सी आर पाटील आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये सहभागी हायस्कूल माध्यमिक विद्यालय जांबोटी, श्री माऊली विद्यालय कणकुंबी राजश्री शाहू हायस्कूल ओलमणी, छत्रपती संभाजी हायस्कूल बैलूर
सरकारी हायस्कूल आमटे, कान्सुली हायस्कूल कान्सुली सरकारी हायस्कूल नलावडे कित्तूर राणी चन्नम्मा हायस्कूल . आमटे हायस्कूल यांचा सहभाग होता व या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अजित सावंत सरांनी केले.