खानापूर

जांबोटी वडगाव येथे शहीद धोंडीबा देसाई यांच्या स्मरणार्थ कमानीचा कॉलम पूजन कार्यक्रम संपन्न

खानापूर: वडगाव जांबोटी, ता. खानापूर येथील सुपुत्र आणि कारगिल युद्धात 1999 मध्ये शहीद झालेले धोंडीबा नारायण देसाई यांच्या सन्मानार्थ उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वार कमानीचा कॉलम पूजन  सोहळा नुकताच थाटात पार पडला. या कार्यक्रमात प्रथम कॉलम पूजन तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते, तर दुसरा कॉलम पूजन माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, “देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद धोंडीबा देसाई यांच्या स्मरणार्थ उभारलेली ही कमान युवकांना देशभक्तीची प्रेरणा देणारी ठरेल. युवकांनी व्यसनमुक्त राहून सैन्यात भरती व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

प्रमुख वक्ते भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी शहीद धोंडीबा देसाई यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमात शहीद धोंडीबा देसाई यांच्या मातापित्यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या नेतेमंडळींमध्ये आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील, सौ. धनश्री करणसिंह सरदेसाई,  भाजपा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य व भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, जय हनुमान सोसायटीचे संस्थापक चेअरमन शाहू राऊत, हनुमान सोसायटीचे चेअरमन व भाजपाचे  नेते लक्ष्मण झांजरे, समितीचे आबासाहेब दळवी यांचा समावेश होता.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या