जांबोटी सरकारी मराठी शाळेची इमारत कोसळली; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका
जांबोटी: येथील लोअर प्रायमरी सरकारी मराठी शाळेची एक वर्गखोली अतिवृष्टीमुळे पूर्णपणे कोसळली असून, आणखी दोन खोल्यांचे छतही कोसळले आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या बाकड्यांसह इतर शैक्षणिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, कोसळलेल्या वर्गखोलीची अर्धी भिंत अजूनही उभी असली तरी ती मुख्य प्रवेशद्वाराच्या मार्गात असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करताना जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांनी ही गंभीर माहिती जांबोटी ग्रामपंचायतीकडे दिली आहे.
ही माहिती मिळताच ग्रामपंचायत पीडीओ राजू तळवार, सचिव शिवाजी धबाले, व ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यांनी यासंबंधीचा सविस्तर अहवाल शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल, असे सांगितले आहे.
तसेच, शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका ठरू शकणारे सर्व साहित्य योग्य ती कारवाई करून तातडीने हटवले जाईल, अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.
Classroom Collapses in Jamboti Government Marathi School; Students’ Safety at Risk
A classroom at the Lower Primary Government Marathi School in Jamboti collapsed due to heavy rainfall. Additionally, the roofs of two other rooms have also caved in, damaging benches and other educational materials, causing significant losses.
One of the collapsed classroom’s walls is half-standing and located along the main entrance path. This poses a serious threat to the lives of the students as they move in and out of the school premises. In light of this danger, the School Development and Monitoring Committee (SDMC) president, vice-president, and directors have reported the situation to the Jamboti Gram Panchayat.
Upon receiving the information, PDO Raju Talwar, Secretary Shivaji Dhabale, and Gram Panchayat Vice President Sunil Desai visited the site and inspected the damage. They assured that a detailed report will be sent to senior government officials.
The Gram Panchayat has also informed that all hazardous materials posing a risk to the students’ safety will be promptly removed and appropriate action will be taken to ensure their well-being.