खानापूर

जांबोटी-निलावडे कृषी पत्तीनचे कर्ज वाटप कधी? शेतकऱ्यांचा सवाल

खानापूर(जांबोटी): गेल्यावर्षी घेतलेले कर्ज भरून दोन महिने संपत आले तरी जांबोटी- निलावडे कृषिपत्तीनकडून अद्याप यंदाचा कर्ज पुरवठा अजून का झाला नाही असा प्रश्न जांबोटी ओलमणी, चापोली परिसरातील शेतकऱ्यांतून विचारण्यात येत आहे.

गेल्या वर्षी सुमारे हजारच्या घरात सभासदांचे दोन कोटीहून अधिक गेल्यावर्षीचे कर्ज भरून घेण्यात आले आहे. ते पंधरा दिवसांत पुन्हा शेतकऱ्यांना वाटप केले जातात, शिवाय जांबोटी भागांतील इतर सोसायटीनी कर्ज पुरवठा केलेला असताना जांबोटी कृषीपत्तीनकडून वेळेत कर्ज पुरवठा का होईना. आणखी किती दिवस आम्हीं प्रतीक्षा करावी असेही शेतकऱ्यांतून विचारण्यात येत आहे.

जूनमध्ये गेल्यावर्षी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी भरले होतें. त्याचे वाटप पंधरा दिवसांत होणे गरजेचे होते. मात्र, ऑगस्ट महिना आला तरी अद्याप कर्ज पुरवठा होण्याबाबत कोणत्याच हलचाली दिसत नाहीत. हे कर्ज जुलै महिन्यांत पेरणी, लावणीच्या काळात मिळाले असते तर खत व पेरणी खर्चासाठी शेतकऱ्यांना फायदा झाला असता. तरी तालुका अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर यंदाचे कर्ज वाटप करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

आम्हीं गेल्या वर्षीचे कर्ज भरून दोन महिने संपत आले तरी अद्याप या वर्षीचा कर्ज पुरवठा का? झाला नाहीं. आम्हाला पंधरा दिवसांत नवीन कर्ज देणार असल्याचे सांगण्यात आले होते. पाच टक्क्याने दुसऱ्याकडून कर्ज घेऊन कृषि पत्तींनचे कर्ज भरले आहे. येत्या आठ दिवसांत कर्ज न दिल्यास तालुका कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल. – प्रभाकर बिर्जे, शेतकरी जांबोटी.

कागदपत्रे जमवा जमव करण्यास वेळ लागला. तसेच नवीन वाढीव पतची कागदपत्रे जमा करण्यास वेळ लागला. त्यामूळे येथील कर्ज पुरवठा वेळेत होवू शकला नाही. कर्ज वाटप करण्यास मंजुरी मिळाली असुन, आठ दिवसांत याचे वाटप करण्यात येईल. – शिवपुत्र, तालुका आधिकारी डीसीसी बँक.

jamboti krishi pattin

nilavade krishi pattin

nilavade prathamik krishi pattin sahakari sangh niyamit nilavade

Shree Mahalaxmi Prathamik Krushi Pattin Sahakari Sangh Niyamit, Jamboti

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते