खानापूर

खानापूरमध्ये इंदिरा कॅन्टीन; 10 रुपयात नाश्ता, 20 रुपयात जेवण

खानापूर: शहरातील वर्दळीच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवस्मारक चौकात लवकरच इंदिरा कॅन्टीन सुरू होणार आहे. या कॅन्टीनमध्ये नागरिकांना केवळ १० रुपयांत नाश्ता आणि २० रुपयांत भरपेट जेवण उपलब्ध होणार असून, गरजू आणि सर्वसामान्य जनतेसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.

कर्नाटक सरकारचा हा महत्वाकांक्षी उपक्रम राज्यातील अनेक भागांमध्ये यशस्वीपणे सुरू आहे. मात्र खानापूरमध्ये कॅन्टीनची प्रत्यक्ष सुरुवात केव्हा होणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून उपस्थित होता. आता अखेर हे स्वप्न पूर्णत्वास जात असून, येणाऱ्या आठवड्यात कॅन्टीन सुरू होणार आहे.

हे कॅन्टीन खानापूर तालुका रुग्णालयाच्या आवारात, मॉडेल रिक्षा स्टँडच्या बाजूला उभारण्यात आले असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नगरपंचायतीच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले असून, राज्य सरकारच्या सहकार्याने हे कॅन्टीन चालवले जाणार आहे. कॅन्टीनसाठी आवश्यक निधी सरकारकडून अनुदान स्वरूपात दिला जात आहे.

या कॅन्टीनमध्ये उप्पीट, पुलाव, इडली, चपाती-भाजी अशा प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ सकाळी अवघ्या १० रुपयात मिळतील. तसेच जेवणासाठी २० रुपये आकारले जातील.

तालुक्यातील अनेकांना दिलासा देणारी ही योजना लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?