खेळ

T20 वर्ल्डकप, आज पाउस पडल्यास कोण बाहेर? भारत-ऑस्ट्रेलिया

नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. परंतु हवामान अहवालानुसार, सेंट लुसियामध्ये सकाळी पावसाची 55 टक्के शक्यता आहे आणि तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.

Ind vs Aus live match

India vs Australia, Super 8 T20 WC Live Score

दोन्ही संघांचा सुपर-8 फेरीतील हा शेवटचा सामना असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक गुण जमा होईल. अशा स्थितीत भारतीय संघ 5 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघ 3 गुणांसह सुपर-8 फेरी पूर्ण करेल. दुसरीकडे, अफगाणिस्तानने आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केल्यास त्याचे 4 गुण होतील आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडेल.T20 World Cup

Team India and Team Australia

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

India vs Australia Live Streaming T20 World Cup

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.

T20 World Cup 2024

Live Cricket
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते