कार्तिकी एकादशीनिमित्त,हुबळी–पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे सेवा
बेळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने विशेष आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी–पंढरपूर या मार्गावर दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावसह खानापूर, लोंडा आणि परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या रेल्वेला स्लीपरसह जनरल डबे जोडण्यात आले असून वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे.

रेल्वेचा वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
दि. 29, 30, 31 ऑक्टोबर तसेच 1, 2, 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.10 वा. हुबळी येथून रेल्वे सुटणार असून सायंकाळी 4.00 वा. पंढरपूर येथे पोहोचेल. त्याच दिवशी सायंकाळी 6.00 वा. पंढरपूरहून परतीचा प्रवास सुरू होईल आणि रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 4.00 वा. हुबळीला पोहोचेल.
थांबे :
धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, धळगाव, जत रोड, वसूड, सांगोला.

