ऑटो

Honda Activa ची इलेक्ट्रिक स्कूटर, कधी येणार बाजारात

बेंगळूर: देशात वाढत चाललेला इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी पाहता, होंडा Activa Electric सेगमेंट मध्ये उतणार असल्याची माहिती आहे. होंडा आपला पहिला प्लांट कर्नाटकात उभारणार असून इतर इलेक्ट्रिक गाड्यांना टक्कर देण्यासाठी बाजारात उतरणार आहे.

आज पर्यंतचा इतिहास पाहता होंडा Activa हि टू-व्हीलर देशातील सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर आहे. महिला असो किवा पुरुष दोघांच्याहि आवडीची हि स्कूटर. activa आतापर्यंत फक्त पेट्रोलवर चालत होती पण लवकरच होंडा या गाड्यांना इलेक्ट्रिक बनवून बाजारात आपला दबदबा कायम ठेवण्याच्या तयारीत आहे.

देशातील अनेक नागरिक होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिकच्या लाँचिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या या स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्याची गरज नाही. स्कूटरचा आवाज कमी आणि पेट्रोलचा खर्चही वाचतो.ज्यांनी आपल्या आवडीच्या ब्रांडची इलेक्ट्रिक गाडी चालवायची ईच्छा आहे. त्यांना डिसेंबर पर्यंतची वाट पहावी लागणार आहे. कारण होंडा आपल्या Honda Activa Electric गाड्यांचे प्रोडक्शन डिसेंबर पासून सुरु करेल अशी अशा आहे.

Activa Electric आल्यास स्पर्धा वाढणार

सध्या बाजारात ओला, एथर, टीव्हीएस च्या इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार विक्री चालू आहे. पण काही लोक आपल्या आवडत्या ब्रांड शिवाय गाडी खरेदी करत नाहीत. त्यामुळे बाजारात जर Activa आली तर हि स्पर्धा अजून वाढणार आहे.

Activa Ev ची मोठ्या मार्केटवर नजर

जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याची होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक ची नजर असेल. बाजारात उपलब्ध इलेक्ट्रिक स्कूटर पेक्षा काहीतरी वेगेळे करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. असेही सांगण्यात येत आहे कि होंडा इलेक्ट्रिक ( Honda Electric ) ची बटरी हि फिक्स्ड बॅटरी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते