खानापूर
पंढरपूर येथे होनकल ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी निवासस्थान उभारणी; स्लॅब भरणी कार्य उत्साहात पार
पंढरपूर : (ता . 5 ऑगस्ट ) – होनकल येथील समस्त वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांच्या वतीने पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी निवासस्थान उभारले जात आहे. या उपक्रमाच्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम आज (५ ऑगस्ट) उत्साहात पार पडला.

कार्यक्रमावेळी पंच कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच वारकरी संप्रदायाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तीभावाने आणि एकात्मतेने उभारले जाणारे हे निवासस्थान भाविक व वारकऱ्यांसाठी मोठे योगदान ठरणार आहे.
सामूहिक श्रमदान, आर्थिक योगदान आणि एकत्रित प्रयत्नांमुळे हे कार्य शक्य झाले आहे. या उपक्रमातून भक्ती, सेवा आणि समाज बांधणीचा आदर्श निर्माण झाला आहे.