खानापूर
होळीच्या पार्टीत मित्रांमध्ये गोंधळ – दारूच्या नशेत चाकूहल्ला!
बेळगाव, शहापूर – होळी साजरी करताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि दारूच्या नशेत चाकूहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

शहापूरमधील बाहेरील भागात घडलेल्या या घटनेत प्रकाश चतुर (वय 63, रहिवासी शहापूर) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.