खानापूर

सौंदत्ती यल्लम्मा मंदिर दानपेटीतील मोजणी पूर्ण; तब्बल ₹3.68 कोटींची देणगी जमा

सौंदत्ती: प्रसिद्ध यल्लम्मा देवी मंदिरात गुरुवारी झालेल्या हुंडी मोजणी प्रक्रियेत तब्बल ₹3.68 कोटींची देणगी जमा झाली आहे. यंदाची ही देणगी रक्कम विक्रमी ठरली असून, मंदिराच्या इतिहासात प्रथमच ₹4 कोटींच्या जवळपास रक्कम जमा झाली आहे.

दरवेळी हुंडी मोजणीवेळी ₹1 कोटी ते ₹1.5 कोटींची देणगी जमा होत होती. मात्र, यंदा भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी दिल्यामुळे रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. यल्लम्मा देवीच्या जत्रोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या काळात हजारो भाविक मंदिराला भेट देतात, त्यामुळेच यंदा हुंडीतील रक्कम विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.

मंदिर प्रशासनाने देणगीच्या संकलनाची अधिकृत नोंद घेतली असून, मंदिराच्या विकास आणि सामाजिक उपक्रमांसाठी याचा योग्य वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते