खानापूर
खानापूर तालुक्यात मुसळधार, नदी नाले तुडुंब
खानापूर : पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी निर्माण झाली आहे.कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या 7 ते 8 दिवसापासून धुवांधार पाऊस पडत आहे. कणकुंबी भागात सतत पडत असलेल्या पाण्याने नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.
हबनहट्टी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्रीस्वयंभू मारुतीच मंदिराच्या छत सध्या बुडाले असून पाण्याची पातळी वाढत आहे. या भागात दोन दिवस असाच पाऊस पडला राहिला तर खानापूर शहरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्हिडिओ:2K23
खानापूर शहरात 84 मि.मी तर कणकुंबी भागात 105 मि.मी पाऊस झाला आहे.शेतकरी वर्ग रोप लागवडीच्या कामांना सुरूवात करताना दिसत आहे.
heavy rain in Kankumbi
rain in Khanapur
#Khanapurvarta #Khanapur #Kankumbi #jamboti