हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा,घटस्फोट झाला तर..
हार्दिक पांड्या साठी हे वर्ष खूप कठीण जाताना दिसत आहे. पहिली गोष्ट म्हणजे हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 मध्ये खराब कामगिरी झाली होती. हा संघ प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकला नाही आणि आता त्यांचे घर तुटणार असल्याची बातमी येत आहे. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचला घटस्फोट देणार आहे. मात्र, हार्दिक किंवा नताशा ने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण, सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करणारे हे कपल आता एकत्र दिसत नाही.
हार्दिक (hardik pandya) आणि नताशा (Natasa Stankovic) यांनी 14 फेब्रुवारीपासून कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. मात्र त्यानंतर नताशाने आपल्या सोशल मीडिया बायोमधून पांड्या आडनावही काढून टाकले आहे. इतकंच नाही तर हार्दिकने पत्नी नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. सध्या हार्दिक लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. त्याचबरोबर तो आपल्या पत्नीसोबत दिसत नाही. याच कारणामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या सतत चर्चेत आहे. इतकंच नाही तर आयपीएलमध्ये हार्दिकचा सामना पाहण्यासाठी नेहमी येणारी नताशा यावेळी संपूर्ण सीझन आली नाही. याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.
नताशा आणि हार्दिक या दोघांनीही गेल्या काही काळापासून एकमेकांबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही किंवा सोशल मीडियावर एकमेकांशी संवादही साधला नाही. मात्र हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी शर्मा नताशाच्या पोस्टला सतत लाइक किंवा कमेंट करत असतात.
घटस्फोट झाल्यास हार्दिकला 70 टक्के मालमत्ता द्यावी लागू शकते Hardik-Natasha Divorce
रिपोर्टनुसार, जर हार्दिक पांड्याने आपली अभिनेत्री पत्नी नताशाला घटस्फोट दिला तर त्याला आपल्या एकूण संपत्तीच्या 70 टक्के रक्कम तिला द्यावी लागेल. पंड्या हा बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातील खेळाडू आहे. यामुळे त्यांना दरवर्षी कोट्यवधीरुपयांचे रिटेनरशिप शुल्क मिळते. याशिवाय आयपीएलमध्ये त्याला 15 कोटींहून अधिक मानधन मिळते. ते ब्रँड एंडोर्समेंटही करतात. त्यातून ते पैसेही कमवतात.
हार्दिकने वर्षभरापूर्वी दुसरे लग्न केले होते Hardik pandhya second marriage
हार्दिक पांड्याने मे 2020 मध्ये त्याची सर्बियन अभिनेत्री गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविचसोबत लग्न केले होते. कोविड-19 लॉकडाऊनदरम्यान या जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची घोषणा केली होती. त्याच वर्षी जुलै महिन्यात या जोडप्याने आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य पंड्या होते. अलीकडेच फेब्रुवारी 2023 मध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रीतीरिवाजांनी दुसरे लग्न केले.