हलशी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
खानापूर : शनिवार दि. 30 ऑगस्ट 2015 रोजी खानापूर तालुक्यातील हलशी हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. केळकर यांनी भूषविले होते. या स्नेहमेळाव्यास शाळेचे आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली. त्यांना यळ, पुष्पवृष्टी व टाळ्यांच्या गजरात सन्मानित करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.
यानंतर माजी शिक्षकांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. के. ओडुळकर सरांनी प्रास्ताविक करून स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
माजी शिक्षक श्री. ओ. एन. गुरव, श्री. एस. जी. शिंदे, श्री. सी. बी. हवालदार, श्री. के. आय. ओउठकर, श्री. ए. पी. गावडे, सौ. आर. सी. शहापुरकर व श्री. वाय एल पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

