खानापूर : हलगा (ता. खानापूर) येथे श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी आवश्यक निधी संकलनासाठी देणगी पावती बुक प्रकाशित करण्यात येणार आहे.
हे प्रकाशन कार्यक्रम रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता हलगा गावच्या माहेरवाशीनी व ग्रामस्थांच्या हस्ते पार पडणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम सुरू असून या कामासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. यासाठी देणगी पावती बुकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व माहेरवाशीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्वार समितीचे अध्यक्ष रणजीत कल्लाप्पा पाटील व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.