खानापूर

हलगा: कलमेश्वर सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत बचाव पॅनलचा विजयाचा जल्लोष

खानापूर: हलगा येथील कलमेश्वर मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कलमेश्वर सोसायटी बचाव पॅनलचे पाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी उत्साहाने भाग घेतला आणि निवडणूक प्रक्रियेला प्रतिसाद दिला. 

हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजीत कल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री कलमेश्वर मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी बचाव पॅनलचे सात उमेदवार उभे केले होते. यामध्ये ग्राम पंचायत सदस्य सुनील मारुती पाटील (हलगा), नझीरसाब हलशीकर (जांभेगाळी), ज्योतिबा केदारी भातकांडे (हलशी), लक्ष्मण बाळू पाटील (मेरडा), विठ्ठल बाबू जाधव (मळवाड) हे उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले.  


या विजयाचा आनंद साजरा करताना रणजीत पाटील व त्यांचे समर्थक सकारात्मकतेने पुढील कामकाजासाठी सज्ज झाले आहेत. निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी सहकाराची भावना जपली असून, सोसायटीच्या प्रगतीसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते