खानापूर
हलगा ग्रामपंचायतीला नवा अध्यक्ष मिळणार – निवडणुकीचा दिवस ठरला!
खानापूर: हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटीस देण्यात आली असून, 20 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

ही जागा मागासवर्गीय “ब” गटासाठी राखीव असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नामनिर्देशन अर्ज भरणे, छाननी, अर्ज मागे घेणे आणि गरज पडल्यास मतदानाची प्रक्रिया अशा टप्प्यांत निवडणूक पार पडेल. मतमोजणीनंतर निकाल तत्काळ जाहीर केला जाणार आहे.