गुंजी: पालखीच्या दिवशी बैलजोड्यांनी मंदिराभोवती फेरी मारण्याची परंपरा आहे. मात्र, अलीकडच्या काळात या परंपरेत सहभागी होणाऱ्या बैलजोड्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळे या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी, गुंजी सोशल फाउंडेशन, गुंजी यांच्या वतीने हौशी बैलजोडी मालकांसाठी खास योजना राबवली जात आहे.

🔸 प्रत्येक सहभागी बैलजोडी मालकास
रु. 501/- प्रोत्साहनपर
बक्षीस देण्यात येईल.
गुंजी सोशल फाउंडेशन यांच्याकडून
🔸 तसेच सुंदर रीतीने सजवलेल्या
बैलजोड्यांसाठी स्पर्धा देखील
आयोजित करण्यात येत आहे.
🏆 प्रथम पारितोषिक – रु. 2001/-
श्री मारुती कल्लापा घाडी
उद्योजक पुणे यांच्याकडून.
🥈 द्वितीय पारितोषिक – रु. 1501/-
श्री महेश नारायण बिर्जे
उद्योजक बेळगाव यांच्याकडून.
🥉 तृतीय पारितोषिक – ₹ 1001/-
श्री संदीप खेमाण्णा घाडी
माऊली मेडिकल गुंजी यांच्याकडून.
🎖 चतुर्थ पारितोषिक – रु. 601/-
श्री. रामचंद्र शंकर करंबळकर
मॅनेजर, सातेरी माऊली
सोसायटी, गुंजी यांच्याकडून.
ही सुवर्णसंधी साधून, गुंजी आणी पंचक्रोशीतील सर्व हौशी बैलजोडी मालकांनी आपल्या बैलजोड्या आकर्षक आणि पारंपरिक पद्धतीने सजवून, मंदिराभोवती फेरीसाठी उपस्थित राहावं, ही विनंती.
आपल्या परंपरेचा गौरव वाढवण्यासाठी आणि बैलजोडी संस्कृती जपण्यासाठी, गुंजी सोशल फाउंडेशनचा हा एक उपक्रम.
बैलजोडी मालकाना सूचना ℹ️
- बैलजोडीच्या दोन्ही बैलांच्या खांद्यावर जु असणे आवश्यक आहे.
- एक बैलासह सहभागी होणाऱ्या मालकास मानधनासाठी पात्र मानले जाणार नाही.
- विजेत्या बैलजोडी मालकांचे नाव व त्यांचे पारितोषिक दी. 3 ऑक्टोबर रोजी नाटकाच्या मंच्यावर दिले जाईल.