खानापूर: गुंजी ते लोंढा रेल्वेस्थानकांदरम्यान मंगळवारी रात्री एक अनोळखी इसम धावत्या रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झाला. या घटनेची नोंद बेळगाव रेल्वे पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
सुमारे 55 ते 60 वयोगटातील या इसमाच्या खिशात बेळगाव ते हुबळी मार्गाचे रेल्वे तिकीट सापडले आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या इसमाची ओळख पटलेली नसून, कोणाला याबाबत अधिक माहिती असल्यास त्यांनी 9480802127 या क्रमांकावर बेळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.