खानापूर

गुंजी ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा, नागरिकांच्या जीवाला धोका

खानापूर: तालुक्यातील माडीगुंजी गावात जवळपास सहा महिने झाले तरी गावातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या नसल्याने गावातील नागरिकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

चित्रातील दाम्पत्य स्वतःच्या घरासमोरील टाकी साफ करताना

गावातील पाण्याच्या टाक्या अनेक दिवसांपासून स्वच्छ केल्या नसल्याने पिवळ्या टाक्यांच्या रंग काळा तसेच आत किडे निर्माण होत आहेत. अश्याच  टाक्यांची स्वछता गावातील नागरिकांना करावी लागत आहे. ग्राम पंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होत आहे. गावात मोठ्या नाल्यासह अनेक लहान नाल्यांची अनेक दिवसांपासुन सफाई नाही.  गावात डुक्कर, माकड, डासांमुळे डेंग्यू तसेच रोगराई मोठया प्रमाणात वाढलेली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या कामांकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते