खानापूर
ब्रेकिंग न्यूज: बेळगावमध्ये भरदिवसा खून! रिक्षाचालकाच्या हल्ल्यात माजी आमदाराचा मृत्यू
बेळगाव | १५ फेब्रुवारी: आज दुपारी बेळगाव शहरातील खडेबाजार परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा एका रिक्षाचालकाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. घटनेनंतर मार्केट पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मामलेदार हे श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते. आज दुपारी ते कार घेण्यासाठी बाहेर पडले असता, एका रिक्षाने त्यांच्या गाडीला धडक दिली. यावरून मामलेदार आणि रिक्षाचालकात वाद झाला. संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने मामलेदारांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला.
गंभीर अवस्थेत असलेल्या मामलेदारांनी लॉजकडे धाव घेतली, मात्र रिसेप्शन काउंटरजवळ ते कोसळले. लॉजच्या मॅनेजरने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संपूर्ण बेळगाव हादरून गेले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रिक्षाचालकाचा गुन्हा ठरवण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
