गोव्याच्या बागा बीच किनाऱ्यावर बोट उलटली, 12 पर्यटकांची सुटका
Unregistered boat capsizes off Goa beach 12 tourists rescued
पणजी, 10 ऑक्टोबर : गोव्यातील बागा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी एक नोंदणी नसलेली जॉयराइड बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत जीवरक्षकांनी 12 पर्यटकांची सुटका केली.
या बोटीला वॉटर स्पोर्टस ची परवानगी नव्हती, अशी माहिती पर्यटन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. सुटका करण्यात आलेले पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते.
दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यापासून 100 मीटर अंतरावर खवळलेल्या पाण्यामुळे बोट उलटली, अशी माहिती राज्य सरकारने नेमलेल्या दृष्टी मरीनया जीवनरक्षक संस्थेच्या अधिकाऱ्याने दिली.
एजन्सीच्या लाईफ गार्डला हा अपघात लक्षात आला आणि त्याने आरडाओरडा केला. बागा आणि कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले इतर जीवरक्षक जेट स्कीसह बचाव कार्यात मदत करण्यासाठी धावले.
उलटलेल्या बोटीखाली अडकलेल्या चार वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा अशा दोन मुलांना वाचवण्यात एका जीवरक्षकांना यश आले.
एका 42 वर्षीय महिलेला सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) देऊन जिवंत करण्यात आले.
त्यानंतर नोंदणी न करता बोट चालवल्याबद्दल बोट जप्त करण्यात आल्याची माहिती राज्याच्या पर्यटन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गोव्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत बोटी चालविणे हे राज्याच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असून त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे, असे विभागाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, नोंदणी नसलेल्या बोटींमुळे पर्यटकांची सुरक्षितता तर धोक्यात येतेच, शिवाय शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार ठरवत असलेल्या मानकांनाही धक्का बसतो.
आम्ही कोणतेही उल्लंघन खपवून घेणार नाही, असा स्पष्ट संदेश या घटनेने द्यावा, असे ते म्हणाले.
baga beach accident