खानापूर
गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात, चालक जखमी
हळियाळ–दांडेली राज्य महामार्गावर आज मंगळवार सकाळी 9:30 वाजता एक अपघात घडला. गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गुड्स वाहनाचा चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्ता सोडून बाजूच्या झाडाला धडकले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

जखमी चालक विनायक चाटी हा हुकेरी तालुक्यातील अमीन भाव गावचा रहिवासी आहे. अपघातानंतर तो वाहनात अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत वाहनाचे दरवाजे तोडून त्याला बाहेर काढले आणि 108 रुग्णवाहिकेद्वारे दांडेली शहराच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.