खानापूर: गणपतीचा सण म्हटलं तर आनंदाचे वातावरण चोहीकडे पसरते, गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर आल्याने खानापूर शहर आणि तालुक्यांत गणपतीची जय्यत तयारी सुरू आहे. घरगुती गणपती सोबत अनेज गावात सार्वजनिक गणपती बसवले जातात या अकरा दिवसात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात.
पण यंदा आपले भारतीय खेळ आणि परंपरा जपण्यासाठी व हौशी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,गर्बेनहट्टी यांनी सोमवार दिनांक 09/09/2024 रोजी भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मंडळाकडून येत्या सोमवारी पुरुष व महिलांसाठी ही स्पर्धा प्राथमिक मराठी शाळा, गर्बेनहट्टी या ठिकाणी भरवली जाणार आहे. ही स्पर्धा पुरुष 60 किलो वजन गटासाठी आणि एक गाव एक संघ अशी असणार आहे.
या स्पर्धेत पुरूषांकरिता प्रवेश शुल्क 701/- व महिलांकरिता 401/- असून पुढील प्रमाणे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
पुरुष गट
प्रथम क्रमांक – 15,001/-
द्वितीय क्रमांक – 10,001/-
उत्कृष्ट चढाई व पकड पट्टूनसाठी प्रत्येकी 501/- रुपयांची बक्षिसे मंडळाने ठेवलेली आहेत.
फक्त पुरुषांसाठी नाही तर खानापूर तालुक्यातील महिला क्रीडा पटूना प्राधान्य व बळ देण्यासाठी मंडळाने पुढील प्रमाणे बक्षिसे जाहीर केलेली आहेत.
प्रथम क्रमांक – 10,001/-
द्वितीय क्रमांक – 7,001/-
उत्कृष्ट चढाई व पकड पट्टूनसाठी प्रत्येकी 501/- रुपयांची बक्षिसे मंडळाने जाहीर केलेली आहेत.
नियम व अटी:
ही स्पर्धा एकदिवसीय असून दिवसा खेळवली जाईल व पाऊस आल्यास थोडा विलंब होईल.येताना खेळाडूंनी आपली आधार कार्ड सोबत आणावी.
पुढील नियम व अटी या पंचान कडून मैदानावर सांगण्यात येतील.
तर सर्व हौशी खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा ही विनंती व संघ नोंदणीसाठी खालील फोन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाने केले आहे.
+91 -9353188612 ,8722567678
+91 -7337817703,9164398239