खानापूरबातम्या

आपल्या गावी अजुनही होतय का …? असं गणपती विसर्जन

खानापूर: खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील चोर्ला  गावात काल पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले . यावेळी गावातील सर्व गणपती एकत्र विसर्जीत करण्यात आले. 

आजकाल शहरातल्या घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाला जेमतेम 2-4 लोक असतात ,एकाच्या हातात गणपती दुसऱ्याच्या हाती टाळ आणि तिसऱ्याच्या हाती फटाक्याची माळ. शहराताचं नाही तर गावात देखील आता हळू हळू हे चित्र दिसू लागेल आहे. उत्सवाच्या या बदलत्या चित्रात एक समाज म्हणून आपण एकमेकांपासून दुरावत चाललो आहोत याची जाणीव होते.

आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गणेश चतुर्थी मोजक्या लोकांत साजरी होताना दिसते परंतु खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील चोर्ला  गावात काल पाच दिवसाचे गणपती विसर्जन करण्यात आले . यावेळी गावातील सर्व गणपती एकत्र आणण्याची प्रथा या गावांमध्ये अजूनही आहे व गावातील सर्व गणपती एकत्र ठेवून मुख्य पुजारी गणपत गावकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली  व आरती करून सर्व गणपती विसर्जनास मार्गस्थ झाले .

यामध्ये प्रामुख्याने असे दिसून आले की सर्व मानाचे गणपती व गावातील जवळजवळ शंभर गणपती एकत्र आल्यानंतरच सर्व विसर्जना जाण्याची प्रथा या गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावरून गावातील एकजूट व पारंपरिक प्रथा यांचे दर्शन आपणास पहावयास मिळते .

मोठमोठ्या शहरात कामानिमित्त असणारे सर्व व्यावसायिक नोकरवर्ग या गणेशाच्या मोठ्या सनाला आपल्या मूळ गावात येऊन हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात व या विसर्जनास सर्व गावातील लहान थोर व गावातील मंडळी एकत्र करतात .

#bappavisarjan

#ganeshchaturthi

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते