खानापूर

आज गणेबैल टोल नाक्यावर रास्तारोको, सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन

गणेबैल टोल नाक्यावर चाललेल्या बेकायदेशीर टोल वसूली तसेच तेथील मनमानी आणि अरेरावी बद्दल आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी राजकीय भेदभाव न करता या आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना राज्य उपाध्यक्ष के पी पाटील यांनी केले आहे.

रस्ता अर्धवट स्थितीत असताना हा टोल नाका चालू करून नागरिकांची लूट करण्यात येत आहे. या रस्त्यामध्ये शेती गेलेल्या शेतकऱ्यांना अजून त्यांची नुकसान भरपाई देण्यात आली नाही.  भारतीय सैनिकांना संपूर्ण भारत देशात टोल माफी  असताना भारतीय सैनिकांशी सुद्धा उद्धट वर्तन केले जात आहे. मात्र काही  भाजपच्या गाड्यांना येथे सुट आहे. एकूणच या टोल नाक्यावर मनमानी सुरू आहे.. त्यासाठी हा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे.

मनमानी आणि अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात कठीण क्रम घेण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 रोजी, सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत  गणेबेल येथील टोल नाक्यावर रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. 

या आंदोलनात सर्वांनी भाग घेण्याचे आवाहन, सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना राज्य उपाध्यक्ष के पी पाटील यांनी केले आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते