मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन औषधोपचार शिबिर
खानापूर (कणकुंबी) : शनिवार दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या आयोजनानुसार सरकारी सिविल हॉस्पिटल खानापूर आणि सिविल हॉस्पिटल बेळगाव यांचेमार्फत शिबिर नियोजित केले आहे.
यांचे संयोजक कणकुंबी आरोग्य केंद्र ग्राम पंचायत कणकुंबी पारवाड आमटे व गोल्याळी तसेच कणकुंबी पंचक्रोशीतील संघ संस्था पंचमंडळ ग्रामस्थ व उदार देणगीदार श्री माऊली मंदिर कणकुंबी व्यवस्थापक मंडळ यांचा सहयोग व सहकारातुन हा उपक्रम होत आहे.
तरी खानापूर तालुक्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती संयोजकांच्या कडून केली आहे.
1. या शिबिरामध्ये डोळे तपासणी मोफत चष्मे दंत चिकित्सा बीपी शुगर स्त्रियांचे आजार व इतर सर्व आजारा वरती तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार केले जाणार आहे.
2. शिबिरामध्ये प्रवेश घेणाऱ्यानी आपल्याबरोबर आधार कार्ड व रेशन कार्ड , फोन नंबर नोंदणीकरिता आणायचे आहे प्रवेश नोंदणी शिबिराच्या ठिकाणी घेतली जाणार आहे.
या शिबिर मध्ये सर्वांनी उत्स्फूर्त भाग घ्यावा अशी विनंती समारंभाचे अध्यक्ष , ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, आणि खानापूर तालुका आरोग्य अधिकारी व कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रा पं कणकुंबी पारवाड आमटे गोल्याळी येथील पंचमंडळी ग्रामस्थ संघ संस्था पदाधिकारी यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.