माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना अटकेची भीती
बेंगळुरू : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या पॉक्सो प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे.
येडियुरप्पा यांच्याविरोधात दाखल झालेल्या पॉक्सो प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे वर्ग केला होता. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी येडियुरप्पा यांना यासंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी वेळ मागितला होता.
येडियुरप्पा यांच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्याचे सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत असून गरज पडल्यास येडियुरप्पा यांना अटक करू, असे गृहमंत्री डॉ जी. परमेश्वर यांनी सागितले.
14 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती की, महिलेच्या मुलीने आपला मुद्दा मांडण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले. परंतु या महिलेने यापूर्वी 50 हून अधिक जणांविरुद्ध असाच गुन्हा दाखल केल्याचे समजते.