क्राईम

बापानेचं घेतला चिमुकल्यांचा जीव, पत्नीच्या तक्रारीनंतर जन्मठेपेची शिक्षा

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथे दोन चिमुकल्यांचा बापाने जीव घेतल्याने संपूर्ण बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. मानसिक तणावाखाली जाऊन अंधश्रद्धेतून पोटच्या दोन मुलांचा खून केलेल्या पित्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनिल चंद्रकांत बांदेकर (रा. रामनगर, कंग्राळी खुर्द) असे त्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्एया माहितीनुसार पीएमसी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या कंग्राळी खुर्द येथे 2021 मध्ये अनिल बांदेकर याच्या घरासमोर उतारा टाकण्यात आला होता. यामुळे तो नैराश्य झाला होता. यामधून अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. या कृत्यातून त्याने आपल्या पोटच्या अंजली (8 वर्षे), अनन्या (4 वर्षे) या दोन्ही मुलींना विष पाजवून खून केला होता. या घटनेनंतर पत्नी जया बांदेकर हिने एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

या मुलींच्या पित्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी साऱ्यांचीच मागणी होती. त्यानुसार त्या मुलींच्या आईने पोलीस स्थानकात न डगमगता तक्रार दाखल केली. याचबरोबर न्यायालयात साक्षही नोंदवली. न्यायालयामध्ये साक्षी, पुरावे तपासण्यात आले. त्यामध्ये अनिल हा दोषी आढळल्याने सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अनिलला जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते