खानापूर Khanapur News: रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्याने वाहतूक व्यवस्था चांगली झाली आहे. त्यामूळे रेल्वेच्या विस्तारलेल्या सुविधांचा खानापूर तालुक्याला लाभ होण्यासाठी या मार्गावरुन धावणाऱ्या गोवा एक्सप्रेससह महत्त्वाच्या पाच एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना खानापूर स्थानकावर थांबा सुरु करावा, अशी मागणी खासदार विश्वेश्वर हेगडे- कागेरी vishweshwar Hegde kageri यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमाण्णा v. somanna यांच्याकडे केली.
खासदार हेगडे कागेरी यांनी सोमवारी (दि. १) नवी दिल्लीत मंत्री सोमण्णा यांची भेट घेऊन कारवार व खानापूरच्या रेल्वे समस्यांबाबत चर्चा केली. लोहमार्गाच्या दुपदरीकरणांतर्गत खानापूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात

आय.टी क्षेत्रातील लोक नियमितपणे गोवा, पुणे, मुंबई, बंगळूर असा प्रवास करतात. त्यांच्या सुविधेसाठी गोवा एक्सप्रेस, बेळगाव एक्सप्रेस, केएसआर बंगळूर एक्सप्रेस, दादर सेंट्रल एक्सप्रेस आणि एसएसएस हुबळी एक्सप्रेस या गाड्यांना खानापूर स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
